रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली गर्दी : प्रहार जनशक्ती परीवर्तन पॅनलचा धुव्वाँ


Maha Vikas Aghadi dominates the Raver Agricultural Produce Market Committee रावेर : कृषी उपन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांपैकी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला 13 जागा तर भाजपा पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनला तीन जागा तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. प्रहार जनशक्तीच्या परिर्वतन शेतकरी पॅनला खात सुध्दा उघडता आले नाही. शनिवरी मतमोजणीस्थळी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणूक निरीक्षक तथा तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या मार्गदर्शनास्वामी विवेकानंद विद्यालयात सात टेबलांवर मतमोजणी झाली. यावेळी सचिव गोपाळ महाजन, कमलेश पाटील, संतोष तायडे मतमोजणीच्या प्रक्रियेत सहकार्य केले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

बाजार समितीत विजयी झालेले उमेदवार
विकासो सोसायटी मतदारसंघात मंदार मनोहर पाटील (344), राजेंद्र चौधरी (342 मते), प्रल्हाद पाटील (313मते), डॉ.राजेंद्र पाटील (293मते), योगीराज पाटील (280 मते), पंकज पाटील (295 मते), पितांबर पाटील (262 मते), महिला राखीव मतदार संघ- मनिषा सोपान पाटील (406 मते), सुनिता दिनेश पाटील (324). इतर मागासवर्गीय मतदारसंघ- सचिन रमेश पाटील (384 मते)ख भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ- जयेश राजेंद्र कुयटे (319 मते). ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ गणेश ज्ञानेश्वर महाजन (404), योगेश ब्रिजलाल पाटील (285). अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ- सिकंदर जमशेर तडवी (351), ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ- पांडुरंग शिवदास पाटील (418), व्यापारी मतदार संघ- रोहीत अनिल अग्रवाल (446) विलास श्रावण चौधरी (343),हमाल मापाडी मतदार संघ सैय्यद अजगर सैय्यद तुकडू (189)

मंदार पाटलांची सहकार क्षेत्रातुन राजकरणात एंट्री
माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांची कृषी उपन्न बाजार समितीत सोसायटी मतदार संघात सर्वाधीक मतांनी विजयी होत सहकार क्षेत्रातुन राजकारण एंट्री केली. स्व. मनोहर पाटील यांचे ते पुत्र आहेत. त्यांना सर्वाधिक मते मिळाली आहे.

जिल्हा बँकेचा हिशोब चुकता
जिल्हा बँकेचा हिशोब मतदारांनी कृषी बाजार समितीत चुकता केला. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून जनतेने दिलेला कौलचा आम्ही आदर करतो.शेतकरी हितासाठी पॅनल काम करणार असल्याचे माजी आमदार अरुण पाटील यांनी सांगितले.

शेतकरी विरोधी धोरणांमुळे महाविकास आघाडीचा विजय
राज्यातील युती सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबविली जात आहे त्यामुळे शेतकर्‍यानी महाविकास आघाडीच्या पनलला बहुमताने निवडून दिल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले.

निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष
मतमोजणी केंद्रापासून माजी आमदार अरुण पाटील यांच्या कार्यालयापर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून आनंद व्यक्त केला. फौजदार सचिन नवले, राजेंद्र करोडपती, पुरषोत्तम पाटील आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !