भुसावळात दोन लाखात एक किलो सोन्याचे मणी देण्याची थाप : पोलिसांच्या सतर्कतेने आंतरराज्यीय भामटे जाळ्यात
In Bhusawal, one kg of gold beads are sold for two lakhs : police vigilance in inter-state scams भुसावळ : दोन लाखात एक किलो सोन्याचे मणी देण्याची थाप मारून फसवणुकीचे प्रकार करण्यापूर्वीच डीवायएसपी यांच्या विशेष पथकातील कर्मचार्यांनी आंतरराज्यीय भामट्यांना अटक केली आहे. शिवपूर कन्हाळा रोडवरील द वर्ल्डजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. किसनलाल दौलतराम बागरी (36, रा.बल्लुर, ता.जि.सिरोही, राजस्थान) व बाबुलाल ओबाराम बागरी (42, रा.लक्ष्मी नगर, बिबल्सर, ता.जि. जालोद, राजस्थान) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर आदींच्या पथकाने केली.
