जळगावातील भाजीपाला विक्रेत्या महिलेला अश्लील शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी
A woman selling vegetables in Jalgaon was threatened to kill by insulting her जळगाव : शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील रहिवासी व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या 36 वर्षीय विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी रविवारी संशयित दिनेश रवींद्र बारी (हरीविठ्ठल नगर, जळगाव) याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अश्लील शिविगाळ करीत धमकी
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर भागात 36 वर्षीय महिला ही पती व तीन मुलांसोबत वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवार, 30 एप्रिल रोजी विवाहिता ही मंदिरात गेली असता दर्शनाहून घरी परत येत असताना त्याच गल्लीतील दिनेश रवींद्र बारी हा किराणा दुकानासमोर उभा होता. त्यावेळी विवाहिता पायी जात असताना त्याने तिचा रस्ता अडून तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तिच्या घरी येऊन पुन्हा तिला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात विवाहितेने पतीसोबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पाटील करीत आहेत.


