इलेक्ट्रीक डिपी बसविण्याच्या नावाखाली जामनेरच्या शेतकर्‍याला अडीच लाखांचा गंडा


A farmer of Jamner was extorted two and a half lakhs in the name of installing an electric DP पहूर : महावितरण कंपनीची ईलेक्ट्रीक डीपी बसवून देतो, असे सांगून शेतकर्‍याकडून दोन लाख 24 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
शिवाजी जयवंत काकडे (49, रा.लोंढरी बुद्रुक, ता.जामनेर) यांचे लोंढरी शिवारात शेत आहे. शेतात नवीन ईलेक्ट्रीक डीपी बसवण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानंतर श्रीराम मांगो राठोड (लोंढरी, ता.जामनेर), सुपडू उखा पाटील आणि नरेंद्र सुपडू पाटील (पिंपळकोठा, ता.जामनेर) यांनी शेतकरी शिवाजी काकडे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोखीने आणि ऑनलाईन पद्धतीने असे एकूण दोन लाख 24 हजार रुपये घेतले. त्यानंतर डीपी बसवून दिली नाही त्यामुळे शेतकरी शिवाजी काकडे यांनी पैसे मागितले असता पैसेदेखील दिले नाही. याप्रकरणी शेतकरी शिवाजी काकडे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !