एकलग्न येथे धाडसी घरफोडी : 48 हजारांचा ऐवज लांबवला


Daring house burglary at Eklagna : 48 thousand compensation extended धरणगाव : तालुक्यातील एकलग्न येथील बंद घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह 48 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना 1 मे रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला टार्गेट
विजय एकनाथ पाटील यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरयांनी हॉलमधील कपाटाचे कुलूप तोडून तसेच देवघरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील तीन ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, सात ग्रॅम सोन्याचे मणी, 18 हजार ुपये किंमतीच्या चांदीची पायल असा एकूण 48 हजार रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अरुण निकुंभ करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !