दुचाकी घसरून अपघात : किनोदच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू


Bike fall Accident : Kinod’s minor son dies जळगाव : दुचाकी घसरून अपघात झाल्याने जळगाव तालुक्यातील किनोद येथील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सुमित ज्ञानेश्वर सपकाळे (15) असे मयत मुलाचे नाव आहे.

दुचाकी घसरून अपघात
सुमित सपकाळे हा 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकी घसरून पडल्याने त्याचा अपघात झाला. अपघातानंतर घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी समिती याला जळगाव शहरातील ओम क्रिटिकल केअर ड्रामा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवार, 1 मे रोजी दुपारी सुमित याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !