मासिक भाड्याने डंपर लावण्याच्या आमिषाने जळगावातील व्यापार्‍याला 62 लाखांचा गंडा

मुंबईतील दोघा आरोपींविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा


62 lakhs to a trader in Jalgaon for the lure of installing a dumper on monthly rent जळगाव : मासिक भाड्याने डंपर घ्या आम्ही नियमित भाडे देवू तसेच हप्तेदेखील भरू, असे सांगून मुंबईतील भामट्यांनी जळगावातील व्यापार्‍याची तब्बल 62 लाख 62 हजारांची फसवणूक केली. जळगाव शहर पोलिसात या प्रकरणी दोघांविरोधात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास संपादन करीत फसवणूक
राहूल जयप्रकाश बाविस्कर (31, टेलिफोन नगर, जळगाव) या तरुणाशी जळगावातील गोलाणी मार्केटमधील जयको ग्लोबल प्रा.लि.कंपनीच्या कार्यालयात संशयित रोहन विजय वैद्य अणि विजय वैद्य (दोन्ही रा.सेनापती बापट रोड, मुंबई) यांच्याशी ओळख झाल्यानंतर तुम्ही बँकेकडून हप्त्याने नवे डंपर घ्या व त्यापोटी आम्ही दरमहा एका डंपरला 30 हजार रुपये भाडे देवू, असे संशयितांनी सांगत करारनामा केला. राहुल यांनी बँकेतून कर्ज काढून 2018 मध्ये डंपर खरेदी केले तसेच डंपरच्या हप्त्यांपोटी दहा लाखांचा धनादेश आरोपींनी स्वीकारून तो वटवला मात्र ना डंपरचे मासिक हप्ते भरण्यात आले ना दर महिन्याला तरुणाला मासिक भाडे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने जळगाव शहर पोलिसात तक्रार अर्ज दिला मात्र चौकशीवर अर्ज आल्यानंतर संशयित आले नाहीत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज टाकला मात्र न्यायालयाने तो फेटाळून आला.

मंगळवारी सायंकाळी सात वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहन विजय वैद्य अणि विजय वैद्य (दोन्ही रा.सेनापती बापट रोड, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !