सतखेडा येथील विवाहितेचा छळ : पतीसह सहा संशयीतांविरोधात गुन्हा


धरणगाव : धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील सासर व बोरखेडा, ता.माहेर येथील विवाहितेने माहेरून हुंडा न आणल्याने मारहाण करीत छळ करण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी सात वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह सहा आरोपींविरोधात गुन्हा
धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील माहेर असलेल्या रोहिणी निलेश पाटील यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील निलेश केसरसिंग पाटील यांच्याशी झाल्यानंतर लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून त्रास देण्यासत सुरूवात झाली. लग्नात मानपान दिला नाही आणि माहेरहून हुंड्याचे पैसे आणावे, अशी मागणी करण्यात आली तसेच विवाहितेच्या अंगावरील श्रीधन काढून छळ करण्यात आला. सासू-सासरे नणंद यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला हा छळ सहन झाल्याने विवाहिता धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे माहेरी निघून आल्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती निलेश केसरसिंग पाटील, बेबाबाई केसरसिंग पाटील, सासरे केसरसिंग शंकर पाटील (सतखेडा, ता.धरणगाव), नणंद सुनीता निलेश पाटील, निलेश रमाकांत पाटील (दोन्ही रा. शिरपूर), नणंद रुपाली दिलीप पाटील (लाडली, ता.धरणगाव) यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोती पवार करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !