भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी भुसावळातील अजय भोळेंची वर्णी : खासदार रक्षा खडसेंना वगळले


MP Raksha Khadse dropped from BJP state executive भुसावळ :  भाजपकडून ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण अवलंबण्यात येत असून त्याची प्रचिती भाजपा नवीन प्रदेश कार्यकारीणीतही आली आहे. रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या ऐवजी भुसावळातील माजी नगरसेवक अजय भोळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. भाजपची नवीन प्रदेश कार्यकारीणीची घोषणा बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. दरम्यान, 47 जणांच्या कार्यकारणीतून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना वगळण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाध्यक्षपदाची निवड निश्चित आहे तर यावेळी तीन जिल्हाध्यक्ष निवडले जाणार असून त्यात रावेरसह जळगाव लोकसभा व व जळगाव शहर अशी जिल्हाध्यक्षपदाची निवड होवू शकते, अशी माहितीस सूत्रांनी दिली.

लेवा समाजाला प्रतिनिधीत्व
खासदार रक्षा खडसे यांच्याकडून पक्ष संघटनेचे पद काढून घेण्यात आले असून भाजपा पक्षाच्या या जंबो कार्यकारीणीत जिल्ह्यातील दोन पदाधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात माजी आमदार स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथराव खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर लेवा समाज पक्षापासून दुर जाण्याची भीती असल्यानेच भुसावळातील अजय भोळेंना पद देत पक्षाने लेवा समाजाला पक्षासोबत जवळ ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे या निवडीतून दिसून येत असल्याचे जाणत्यांचे म्हणणे आहे.

तीन जिल्हाध्यक्ष निवडले जाणार
मे महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यावेळी जळगाव व रावेर लोकसभा तसेच जळगाव अशी विभागणी करून तीन जिल्हाध्यक्ष निवडले जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, पी.सी.पाटील, अमोल शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर महाराज-जळकेकर यांची नावे चर्चेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !