अतिक्रमण रोखण्यासाठी गेलेल्या वनकर्मचार्यांवर हल्ला : गारबर्डी वनक्षेत्रात दगडफेकीत वनपालासह तिघे जखमी
रावेर पोलिसात 15 संशयितांविरोधात गुन्हा दाखल : संशयितांची पोलिसांकडून धरपकड
Attack on forest personnel who went to prevent encroachment : Stone pelting in Garbardi forest area including three injured रावेर : गारबर्डी वनक्षेत्रात अतिक्रमण रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर आदिवासींनी दगडफेक करीत हल्ला केल्याने वनपालासह चौघे जखमी झाले तर पथकाच्या ताब्यातून संशयितांनी ट्रॅक्टरही ही पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पाल, ता.रावेर परीसरातील गारबर्डी शिवारात घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात 15 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाच्या पथकावर दगडफेक
गारबर्डी राखीव वनक्षेत्रात मंगळवारी रात्री काही जण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करीत असल्याचे कर्तव्यावरील मजूर राजू तडवी व कय्युम गुलशन तडवी (लोहारा, ता.रावेर) यांना कळाल्यानंतर त्यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावने यांना माहिती कळवली. त्यानंतर रात्री 2.20 वाजता अजय बावने यांच्यासह रावेर वनपाल रवींद्र चिंतामण सोनवणे, पाल वनपाल दीपक रायसिंग, वनरक्षक युवराज मराठे, सविता वाघ, आयशा हुसेन पिंजारी, शांतीनाथ दत्तू बनगे, मुकेश मजीद तडवी, रमेश अरुण भूतेकर, चालक विनोद भास्कर पाटील आदी दाखल झाल्यानंतर पथक कम्पार्टमेंट 25 मधील संरक्षण कुटीसमोर येताच ट्रॅक्टरद्वारे अतिक्रमण करीत असलेले संशयित पसार झाले व जाताना त्यांनी दगडफेक केली.
जमावाने मारहाण करीत ट्रॅक्टर लांबवले
पसार झालेले संशयित पुन्हा काही लोकांनी घेवून अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्यांसोबत आरडा-ओरड करीत मारहाण सुरू केली तसेच जप्त असलेले ट्रॅक्टर लांबवले. संशयितांच्या मारहाणीत वनपाल दीपक गंगाराम रायसिंग, वनरक्षक युवराज काशीनाथ मराठे, राजू बोंदल हे तिघे जखमी झाले.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
वनविभागाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह अतिक्रमण, पथकावर हल्ला व ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी राजू बोंदल यांच्या फिर्यादीवरून देवसिंग दशरथ बारेला, माधव सीताराम पवार, सलीम कालू तडवी, सर्फराज बायखा तडवी, भारसिंग शंकर बारेला, सुमसिंग भावसिंग बारेला, कुंवरसिंग दशरथ बारेला (सर्व रा.लोहारा, ता.रावेर), शरीफ महारू तडवी, युनूस महारू तडवी, मंगल उमाशा बारेला, राजेश देवसिंग बारेला, इंदा भाऊसिंग बारेला, हमजा नथ्थू तडवी (लोहारा, ता.रावेर), पठाण्या खजान बारेला (कुसुंबा, ता.रावेर) व अनोळखी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
