जळगावात चॉपरच्या धाकावर दहशत : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Chopper terror in Jalgaon : Accused in MIDC police net जळगाव : चॉपरच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश शंकर चौधरी (रा.सम्राट कॉलनी जळगाव) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी हद्दीतील एचडी फायर कंपनीजवळ शैलेस चौधरी हा चॉपरसह आल्याची माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सैय्यद, योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील, छगन तायडे आदींनी संशयिताच्या मुसक्या बांधत अटक केली. संशयिताविरोधात यापूर्वी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !