भरधाव आयशरने उडवल्याने एरंडोलचा तरुण ठार : काका जखमी


Young man of Erandole killed by overrun Eicher : uncle injured एरंडोल : भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने पुतण्याचा जागीच मृत्यू ओढवला तर काका गंभीर जखमी झाल्याची घटना एरंडोल-म्हसावद रस्त्यावर उमर्दे गावाजवळील पुलावर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात संदीप खिमा जाधव (22, खेडगावतांडा, ता.एरंडोल) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचे काका भाईदास संतोष राठोड हे गंभीर जखमी झाले असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

आयशर चालकाविरोधात गुन्हा
संदीप जाधव हा तरुण त्याचे काका भाईदास राठोड यांच्यासह दुचाकी (एम.एच.41 बी.जी.4584) ने जात असताना भरधाव आयशर (डी.एन.09 एन.9890) ने जबर धडक दिल्याने संदीपचा मृत्यू ओढवला तर भाईदास राठोड हे गंभीर जखमी झाले तर दुचाकीचे या अपघातात मोठे नुकसान झाले. अपघात प्रकरणी सुनील ताराचंद राठोड (23, खेडगाव तांडा, ता.एरंडोल) यांच्या फिर्यादीनुसार आयशर चालक महेंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत (टोकारखेडा दादर नगर हवेली) याच्याविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक महेंद्र पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !