खेडी कढोलीच्या तरुणाची विषारी द्रव सेवन करीत आत्महत्या
A youth of village Kadholi committed suicide by consuming poisonous liquid एरंडोल : एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील 35 वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी द्रव सेवन करीत आत्महत्या केली. ही घटना गुरूवार, 4 मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानेश्वर रमेश कोळी (35, खेडी कढोली, ता.एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्याचे कारण कळू समजू शकले नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
घरी कुणीही नसताना टोकाचे पाऊल
ज्ञानेश्वर कोळी हा आपल्या पत्नी व दोन मुलांसह एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे वास्तव्याला होता. शेतमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ज्ञानेश्वर कोळी यांच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्याने पत्नी अनिता आणि दोन्ही मुलांसह अमळनेर येथे लग्नासाठी बुधवार, 3 मे रोजी सकाळी नऊ वाजता गेल्यानंतर दुपारी ज्ञानेश्वर कोळी हा अमळनेर येथून खेडी कढोली येथे परतला. मध्यरात्री ज्ञानेश्वर कोळी याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. हा प्रकार गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला. शेजारी राहणार्या ग्रामस्थांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


