नोकरीसाठी दहा लाख न आणल्याने विवाहितेचा छळ : नशिराबादच्या पतीसह सहा संशयितांविरोधात गुन्हा


Harassment of wife for not bringing 10 lakhs for job : Case against six suspects including husband of Nashirabad

जळगाव : पतीला नोकरी लावण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत म्हणून गुजरात येथील माहेर व नशिराबाद येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. या प्रकरणी बुधवार, 3 मे रोजी दुपारी त्यांनी तक्रार दिल्यावरून नशिराबाद पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
उधना सुरत येथील माहेर व नशिराबाद येथील सासर असलेल्या नम्रता दीपक महाजन यांचा नशिराबाद येथील दीपक विठ्ठल महाजन यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला असून लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिल्यानंतर पती दीपकने नोकरीसाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. विवाहितेने पैसे न आणल्याने तिचा मानसिक व शारीरीक छळ करण्यात आला तर सासू, सासरे, ननंद यांनी देखील पैशांसाठी पिळवणूक केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. बुधवारी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती दीपक विठ्ठल महाजन, मालती विठ्ठल महाजन, विठ्ठल शंकर महाजन, हेमलता विठ्ठल महाजन डिंपल विठ्ठल महाजन (सर्व रा.नशिराबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजानन देशमुख करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !