छतावर पावसाचे पाणी साचल्याच्या वादातून बिलवाडीत कुटूंबाला मारहाण


A family was beaten up in Bilwadi due to a dispute over rain water on the roof पहूर : बिलवाडी, ता.जामनेर येथे पावसाचे पाणी छतावर साचल्याच्या वादातून तरुणासह त्याच्या पत्नी व आई-वडीलांना संशयीतांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी पहूर पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयितांविरोधात गुन्हा
अक्षय विकास पाटील (25, बिलवाडी) हा तरुण आई व पत्नी यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. घराच्या छतावर पावसाचे पाणी साचल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे संशयित नाना बाजीराव पाटील, प्रविण नाना पाटील, जितेंद्र नाना पाटील, शुभांगी प्रवीण पाटील, साधना जितेंद्र पाटील (सर्व रा. बिलवाडी) यांनी 30 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अक्षय पाटील तसेच त्यांचे आई-वडील व पत्नी यांना लाकडी काठी, दगडाने बेदम मारहाण केली तसेच आमच्या नांदी लागले तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अक्षय पाटील याने बुधवारी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !