शिरपूर पीपल्स बँकेची 42 लाखात फसवणूक : अमळनेरच्या व्यापार्याविरोधात गुन्हा
Shirpur People’s Bank defrauded of 42 lakhs : A case against a businessman of Amalner अमळनेर : केमिकल युनिटसाठी शिरपूर पीपल्स बँकेतून कर्ज घेवून त्याचे मुदतीत हप्ते व व्याज न भरल्याप्रकरणी अमळनेरच्या व्यापार्याविरोधात तब्बल 42 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा
अशोक धुडकू पाटील (45) यांनी यांनी डी डी.केमिकल्ससाठी शिरपूर पीपल्स बँकेकडून 42 लाख रुपये मुदतीचे कर्ज, तसेच 20 लाख रुपये खेळते भांडवल अशी रोख रक्कम घेतली होती मात्र पाटील यांनी कर्ज न फेडल्याने बँकेने त्यांच्या मंगरूळ येथील औद्योगिक वसाहतीतील गट नंबर 683 9 मधील प्लॉट नंबर 83 च्या डी.डी.केमिकल्सवर सहाय्यक निबंधकांच्या परवानगीने जप्ती बोजा लावला मात्र केमिकल युनिटची अपसेट प्राईस काढण्यासाठी अधिकारी औद्योगिक वसाहतीत गेले असता मशिनरी जागेवर आढळली नाही.
गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
मशिनरी दुरुस्तीसाठी आदेशाने पाठवली आहे, असे खोटे सांगून अशोक पाटील यांनी उडवा-उडवी केली. याबाबत शिरपुर पीपल्स बँकेचे वसुली अधिकारी नरेंद्र माळी यांनी पोलिसात 22 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने बँकेने न्यायालयात फिर्याद दाखल केली व न्यायालयाच्या आदेशाने अशोक पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा व जप्त मालमत्ता परस्पर विकून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.


