बैलाने शिंग मारल्याने शिरसोलीतील वृध्दाचा मृत्यू


जळगाव  : तालुक्यातील शिरसोली येथील वृद्धाचा बैलाने शिंग मारल्याने मृत्यू ओढवला. या प्रकरणी गुरूवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नामदेव पुंडलिक बारी (60) असे मयताचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात नोंद
नामदेव बारी हे आपल्या परीवारासह जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात वास्तव्याला होते व शेती करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी सायंकाळी सा वाजेच्या सुमारास नामदेव बारी यांना बैलाने शिंग मारले. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. गुरूवारी सायंकाळी उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !