पाचोरा शहरात अल्पवयीन मुलीवर सात नराधमांकडून अत्याचार
A minor girl was gang-raped by seven murderers in Pachora city पाचोरा : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात नराधम तरुणांनी धमकावून तसेच आमिष दाखवून अत्याचार केल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत सात आरोपींना अटक केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडीतेचा गरीबी व अज्ञानपणाचा फायदा घेत वेळोवेळी आमिष दाखवून संशयितांनी अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धमकावून केला अत्याचार
सूत्रांच्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडीता आपल्या आजीसोबत वास्तव्यास आहे. पीडीता 27 एप्रिल 2023 रोजी अचानक बेपत्ता झाल्यानंतर पीडीतेच्या आजीने पोलिसात धाव घेतल्यानंतर शोध सुरू करण्यात आल्यानंतर 29 एप्रिल रोजी भडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये पीडीता जेवण करताना आढळल्यानंतर तिला महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी ताब्यात घेत जळगाव बालकल्याण समितीकडे पाठवल्यानंतर पीडीतेचा विश्वास संपादन करून तिची वैद्यकीय तपासणी केली असता पीडीता गर्भवती राहिल्याची बाब उघडकीस आली.
सात संशयीतांनी अत्याचार केल्याची पीडीतेची माहिती
पोलीस उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाउन पीडीतेची चौकशी केल्यानंतर तिने शहरातीलच सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतीन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांनी वेळोवेळी ठिकठिकाणी शारीरीक संबंध ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पाचोरा पोलिसांनी सुरूवातीला दहा संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यातील सात संशयितांची ओळख निष्पन्न करून त्यांच्याविरोधात पीडीतेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.


