भुसावळात साई निर्मल फाउंडेशनतर्फे पतंग वाटप


भुसावळ : शहरातील साई निर्मल फाउंडेशनतर्फे मकर संक्रांतीनिमित्त गोरगरीब बाळगोपाळांना मोफत पतंग वाटप करण्यात आले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे गोरगरीब मुलांनाही पतंग उडवण्याचा आनंद मिळावा या उद्देशाने साई निर्मल फाउंडेशन भुसावळ व ईव्हीएम न्युज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने शहरातील इंदिरा नगर, जामनेर रोड, लक्ष्मी गॅरेज येथे गोरगरीब बालगोपाळांना मोफत पतंग वचॉकलेट्स वाटप करण्यात आले. याप्रसंगी साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे, ईबीएम न्यूज संचालक आर्य चौधरी, रीतेश जैन, आर.के.कोळी, अ‍ॅड.योगेश बाविस्कर, विलास बराटे, सुभाष तांबट, सुभाष बराटे, चंद्रशेखर पाटील, पवन बराटे, मोहित किनगे, लोकेश वारके चौधरी, कुणाल चौधरी, पवन बाकसे, लोकेश वारके, धीरज सोनवणे, कपिल पहुरकर, सुभाष तांबट, नरेंद्र बर्‍हाटे, पंकज लोंढे आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !