संगमनेर पोलीस उपअधीक्षकपदाचा सोमनाथ वाघचौरे यांनी स्वीकारला पदभार


Somnath Waghchoure as Deputy Superintendent of Police, Sangamner संगमनेर : राज्यातील पोलीस उपअधीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. त्यात संगमने पोलीस उपअधीक्षकपदी भुसावळ, जि.जळगाव येथील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी शनिवारी प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव (शिर्डी) यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वाघचौरे यांचे स्वागत केले.

दहा महिन्यांपासून पद होते
संगमनेर पोलीस उपअधीक्षक पद गेल्या काही महिन्यांपासून रीक्त असल्याने प्रभारी पदभार सुरू होता मात्र आता पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या नियुक्तीनंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. वाघचौरे हे भुसावळ येथून बदलून आले आहेत. सर्वसामान्य नागरीकांमध्ये त्यांची छबी लोकप्रिय राहिली असून अनेक गंभीर गुन्ह्यांचा त्यांनी उलगडा केला आहे शिवाय अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून खात्यातही त्यांचा दबदबा राहिला आहे.


कॉपी करू नका.