भुसावळ शहरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचे लोकार्पण


भुसावळ : शहरातील स्वा.वि.दा.सावरकर स्मारक समिती व समर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडजवळ स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी झाला. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते या दुभाजकामध्ये उभारलेल्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी समितीचे सचिव समकित सुराणा, प्रकल्प कार्याध्यक्ष गणेश वढवेकर, परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद सावकारे, समकित सुराणा, महेंद्रसिंग ठाकूर, गिरीष महाजन, सतीश सपकाळे, प्रकाश बतरा, युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, रवींद्र लेकूरवाळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, अनिता आंबेकर, राजेश्री देशमुख, चित्रा सोनवणे, संध्या जोशी, रीता नाईक आदींसह पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळ शहरात सेवार्थ पाणपोईचे लोकार्पण
शहरातील म्युन्सीपल हायस्कूलजवळ स्व.शांतीलाल सुराणा यांच्या स्मृतीनिमित्ताने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पण मंत्री गिरीष महाजन यांनी केले. समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष समकित सुराणा, नितीन सुराणा, राजू सुराणा आदीसह परीवारातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


कॉपी करू नका.