भुसावळ शहरात जी.एन.आर एफ.संघटनेतर्फे पाणपोईचे उद्घाटन


भुसावळ : उन्हाळ्याच्या वाढत्या झळा पाहता वाटसरूंसह नागरीकांची तहान भागण्यासाठी दावत-ए-इस्लामी हिंदच्या (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) तर्फे महंमद अली रोडवरील रजा टॉवरजवळ पाणपार्इेचे उद्घाटन भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी दावत-ए-इस्लामीचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी जीएनआरएफ च्या विभागाीची माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून हाजी सलीम शेठ चुडीवाले, माजी नगरसेवक साबिर शेख, माजीद भाई बर्तनवाले सय्यद फारुक अली, माजी नगरसेवक आशिक खान आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जुबेर अत्तारी, सईद अत्तारी, अजहर कादरी, फरीद शेख, रफिक रोशन कादरी यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.