रावेर पीपल्स बँक निवडणुकीसाठी 28 उमेदवार रींगणात


रावेर : रावेर पीपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 63 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता 13 जागांसाठी 28 उमेदवार रींगणात आहेत. रावेर पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक आहे.

13 जागा व 28 उमेदवार रींगणात
निवडणुकीसाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 63 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 13 जागांसाठी 28 उमेदवार रींगणात आहेत. रावेर पीपल्स बँक निवडणुकीत सहकार पनल आणि लोकमान्य पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. मतदार संघनिहाय उमेदवार असे- सर्वसाधारण मतदार संघामध्ये 18, अनुसूचित जाती-जमातीसाठी दोन, भटक्या जाती-जमातीत 2, इतर मागासवर्गीय 2, आणि महिला राखीवमध्ये चार उमेदवार आहेत. 10 जून रोजी निवडणूक होणार असून 11 जुनला मतमोजणी होईल.


कॉपी करू नका.