वरणगावनजीक दुचाकी अपघात ; पिंप्राळ्यातील दुचाकीस्वार ठार


Bike accident near Warangaon ; Bike rider killed in Pimprala भुसावळ : तालुक्यातील वरणगावजवळील साई मंदिराजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पिंप्राळा गावातील 38 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी घसरून अपघात
घनश्याम अमृत सपकाळे (28, अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांच्या तक्रारीनुसार, शरद किसन जगताप (38, संत मिराबाई नगर, पिंप्राळा, जळगाव) हे दुचाकी (एम.एच.19 ई.डी.8763) ने भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावरून जात असताना साईबाबा मंदिराजवळील सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी घसरून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी पाच वाजता हा अपघात घडला. तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.


कॉपी करू नका.