भुसावळ पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बदली ; नूतन मुख्याधिकारी महेश वाघमोडे आज पदभार घेणार


Transfer of Bhusawal Municipal Commissioner Sandeep Chidrawar ; New Chief Executive Mahesh Waghmode will take charge today भुसावळ : भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जत नगरपरीषदेचे महेश वाघमोडे बदलून येत आहेत. बदली संदर्भातील आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी बुधवार, 31 मे रोजी काढले आहेत.

नवे मुख्याधिकारी आज पदभार घेणार
दरम्यान, संदीप चिद्रवार यांना 31 मे पासून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या बदलीचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. 12 ऑगस्ट 2020 रोजी संदीप चिद्रवार यांची महादूला नगरपंचायतीच्या परीविक्षाधीन मुख्याधिकारी पदावरून भुसावळात बदली करण्यात आली होती. पदभार घेतल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी अनेक विकासात्मक निर्णय घेतले शिवाय सत्ताधार्‍यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या काळात विविध विकासकामांना मुख्याधिकार्‍यांनी प्राधान्य दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !