नाडगावात दोन गटात वाद विकोपाला : रेल्वे स्टेशन परीरसरात तोडफोड


बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गुरूवारी रात्री साडेसातच्या दरम्यान उफाळल्यानंतर जमावाने स्टेशन परीसरातील काही टपर्‍या उलटऊन तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती बोदवड पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जमाव पांगवत घटनेवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीकारी सुरेश जाधव, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उप निरीक्षक भाईदास मालचे यांनी सावदा, वरणगाव, येथून पोलिस बंदोबस्त मागवत परीस्थितीवर नियंत्रण मिळवले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !