जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त भुसावळचे आमदार संजय सावकारेंसह पदाधिकार्यांनी दिल्या शुभेच्छा
भुसावळ : जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीयातून त्यांना शुभेच्छा दिल्या. भुसावळ भाजपाचे आमदार तथा माजी पालकमंत्री संजय सावकारे व उद्योजक मनोज बन्सीलाल बियाणी यांनी पाळधी येथे जावून मंत्री पाटील यांचा सत्कार करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अतुल झांबरे, महेंद्रसिंग ठाकूर, आमदार चिमण आबा पाटील, किरण महाजन, प्रशांत पाटील, रमाकांत महाजन, भूषण महाजन, गोलू राणे उपस्थित होते.

