यावल तहसीलदारपदी मोहनमाला नाझीरकर


यावल : यावल तहसीलदार महेश पवार यांची विनंतीनुसार बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागेवर तहसीलदार म्हणून मोहनमाला नाझीरकर यांनी पदभार स्वीकारला. सोमवारी दुपारी त्यांनी कार्यालयात येवून पदभार घेतला.

पारदर्शक कामाची ग्वाही
मोहनमाला नाझीरकर या पुणे येथे महसूलमध्ये जमाबंदी विभागात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. पदोन्नतीनंतर त्यांनी तहसीलदार म्हणून यावल येथे पदभार स्वीकारला. प्रशासकीय कार्यात गती देणे शिस्त लावण्यासाठी आपण प्रयत्न करीत पारदर्शक काम करण्याची ग्वाही त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली. तहसील कार्यालयांमध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक विभागाचे रशीद तडवी, पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे, संजय गांधी नायब तहसीलदार मनोज थारे, पुरवठा अव्वल कारकून वाय.डी.पाटील, सुयोग पाटील, दीपक बाविस्कर व महसूल च्या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांचे कार्यालयात स्वागत केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !