पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा माजी नगरसेवक पिंटू कोठारींनी केला सत्कार
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोमवारी सकाळी साडेसात वाजेपासून रात्री पर्यंत पाळधी ग्रामपंचायतीच्या जवळ पालकमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. भुसावळचे माजी नगरसेवक तथा साईजीवन सुपर शॉपीचे संचालक पिंटू (निर्मल) कोठारी यांनीदेखील पालकमंत्र्यांची भेट घेत त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.
चाहत्यांच्या प्रेमाने भारावलो
हजारो चाहत्यांचे हे प्रेम पाहून आपण भारावून गेलो असून या ऋणातुन उतराई होणे अशक्य असल्याचे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

22 कोटींच्या योजनेची चाचणी यशस्वी
पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने तब्बल 22 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ही सौर उर्जेवर चालणारी राज्यातील पहिली पाणीपुरवठा योजना आहे. योजना पूर्णत्वाकडे आली असून यातील जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून पाण्याची चाचणी शुभारंभ आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. दोन्ही गावांमधील नागरीकांना लवकरच शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे.
