डांभूर्णीतील तरुणाचा कुलर दुरूस्ती करताना शॉक लागून मृत्यू
Dambhurni youth dies of shock while repairing cooler डांभूर्णी : कुलर दुरुस्ती करताना शॉक लागल्याने डांभूर्णी गावातील निकेश दिनकर नेहेते (26) यांचा मृत्यू ओढवला. ही घटना सोमवार, 5 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारात घडली.
कुलरला स्पर्श करताच बसला जबर झटका
निकेश नेहेते हा घरगुती इलेक्ट्रिकचे काम करीत असताना दुरुस्त केलेले कुलर पुन्हा शॉक मारत असल्याने सोमवारी सकाळी बाळू कोळी यांनी निकेश नेहेते यास घरी बोलावले असता कुठलीही सुरक्षेची साधने न बाळगता कुलरला स्पर्श करताच जेरदार झटका बसल्याने निकेश हा जमिनीवर कोसळला. घरातील लोकांनी विद्युत पुरवठा खंडित करून निकेश नेहेते यास उपचारार्थ जळगाव रुग्णालयात हलवले मात्र रस्त्यात त्याची प्राणजोत मालवली. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. अविवाहित निकेशच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परीवार आहे.
