शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या तरुणीचा हॉस्टेलमध्ये विवस्त्र मृतदेह आढळला

अत्याचाराचा संशय : हॉस्टेलच्या सुरक्षा रक्षकाच्या आत्महत्येने वाढला पेच


मुंबई  :अकोला तालुक्यातील तरुणी मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथील एका वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर वास्तव्यास होती मात्र या तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मंगळवारी सायंकाळी मृतदेह आढळला तर बलात्कार करून तरुणीची हत्या केल्याचा संशय आहे. दरम्यान, याच हॉस्टेलमधील सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया यानेदेखील चर्नीरोड ते ग्रँटरोड स्थानकादरम्यान लोकल समोर येत आत्महत्या केल्याने पेच वाढला आहे. पोलिसांनी आत्महत्येचे सीसीटिव्ही ताब्यात घेतले असून दोन्ही घटनांचा उलगडा मरीन ड्राईव्ह पोलीस करीत आहेत.

गळा दाबून हत्येचा संशय
अकोला तालुक्यातील तरुणी मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात वास्तव्यास होती मात्र तिची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तरुणीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे मात्र शवविच्छेदनात ही बाब समोर येणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !