चोरवड तपासणी नाक्यावर ट्रकभर जळावू लाकूड जप्त : संशयिताला अटक


Truckload of firewood seized at Chorwad check post : Suspect arrested रावेर : विना परवाना जळावू लाकडाची तस्करी होत असताना चोरवड नाक्यावर वनविभागाने ट्रक जप्त केला असून त्यातील 18 हजारांच्या लाकडासह पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी चालक शे.तनवीर शे.निसार (32, रा.चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवरील चोरवड नाक्यावर मंगळवारी पहाटे अडीच वाजता ट्रक (क्र. एम.एच.18 बी.जी.8167) आल्यानंतर ट्रक चालकाला पासबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे तो आढळला नाही शिवाय ट्रकमध्ये जळावू लाकडाची विनापरवाना वाहतूक होत असल्याने वनविभागाने ट्रक जप्त करीत चालक शे.तन्वीर शे.निसार यास ताब्यात घैतले. पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक व 17 हजार 80 रुपयाचे पंचरास जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरवड तपासणी नाक्यावरील वनरक्षक र.अ.भुतेकर, गोविंदा मराठे राजू तडवी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !