मुक्ताईनगरातील अल्पवयीन मुलाचे अपहरण
Kidnapping of a minor in Muktainagar मुक्ताईनगर : शहरातील जुने गाव भागातील चेतन गजानन कासार (17) या अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना 24 मे रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
रेखा गजानन कासार (40, जुनेगाव, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा चेतन यास कुणीतरी काहीतरी फूस लावून अपहरण करीत पळवून नेले. 24 रोजी सकाळी साडेसात ते दुपारी चार दरम्यान हा प्रकार घडला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.
