रीगाव येथील अल्पवयीन तरुणीला पळवले : जालन्यातील तरुणाविरोधात गुन्हा
Minor girl abducted from Rigaon: Crime against youth from Jalanya मुक्ताईनगर : तालुक्यातील रीगाव गावातील अल्पवयीन तरुणीला पळवून नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी संदीप राठोड (हातगाव कोकाटे, ता.परतूर, जि.जालना) या तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित तरुणाचा कसून शोध
अल्पवयीन मुलीच्या 40 वर्षीय पित्याने या संदर्भात मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली असून त्यांची 15 वर्ष तीन महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संशयिताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. 5 ते 6 जूनदरम्यान हा प्रकार घडला. तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.
