चिंचखेड्यातील विवाहितेची विहिरीत उडी घेत आत्महत्या


A married woman in Chinchkheda committed suicide by jumping into a well मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु.॥ गावातील 27 वर्षीय विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजेपूर्वी घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसलेतरी मुक्ताईनगर पोलिसांकडून या प्रकरणी माहिती घेतली जात आहे. पूजा गणेश खोंदले (28, चिंचखेडा बु.॥, ता.मुक्ताईनगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

विहिरीत उडी घेत आत्महत्या
मुक्ताईनगर पोलिसात पूजा खोंदले या विवाहितेचा पती गणेश रवींद्र खोंदले (28) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी पूजा ही बुधवारी सकाळी उठल्यानंतर कुणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडली व पहाटे सहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या विहिरीत एका महिलेने उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर खोंदले यांनी खातरजमा केली असता मयत महिला पत्नी असल्याचे उघड झाले. पोहणार्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुक्ताईनगर पोलिसांनी या प्रकरणी सुरूवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे व सहाय्यक निरीक्षक संदीप दुणगहू यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. विवाहितेच्या आत्महत्येचे गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली. विवाहितेच्या पश्चात पती व लहान मुलगी असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !