भुसावळात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे


Shiv Rajya Abhishek Day celebrations in Bhusawal paid off the eyes भुसावळ : हिंदवी स्वराज्य निर्माते, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठा महिला मंडळतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक दिन 350 वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवकालीन खेळांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

अन् इतिहास राहिला पुन्हा डोळ्यासमोर !
शिवप्रताप दर्शविणार्‍या कलाकारांच्या मागे भुसावळचे आमदार होते आमदारांची शब्दफेक खरंच एखाद्या डबिंग आर्टिस्टला आव्हान देणारी होती तर जिजाऊ माँ साहेबांची भूमिका रजनी संजय सावकारे यांनी ताकदीने उभी केली. दोघेही पती-पत्नीचे शिवछत्रपती प्रतींचे प्रेम आणि श्रध्दा पाहून उपस्थित भारावले.

राज्याभिषेक सोहळ्याने फेडले डोळ्याचे पारणे
पनयन रम्य सोहळयात छत्रपती शहाजी महाराज यांच्या लग्नाचा सजीव देखावा, मुघलांनी मराठी साम्राज्यावर केलेले अन्याय, शिवाजी महाराज यांचा जन्म, महिलांवरील अत्याचार पाहून मुघल सेनेवर हल्ला, गड किल्ले काबीज करणारा पराक्रम तसेच अफजल खानाचा वध व नंतर राज्याभिषेक सोहळा झाला. सनई चौघडे व तुतारींच्या गजरात फटाक्यांची आतषबाजीत नयनरम्य असा राज्याभिषेक करण्यात आला. डॉ.भाग्यश्री भंगाळे व ग्रुपने नृत्य सादर केले. राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवा स्पर्धा झाली. त्यातील विजेत्यांना बक्षीस देवून गौरवण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, प्रांताधिकारी जितेंद्र चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, गजानन पडघण, विलास शेडे, मनोज बियाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके, सर्व संचालक, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा दुध संघाच्या संचालिका शामल झांबरे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, युवराज लोणारी, विजय चौधरी, उद्योगपती मनोज बियाणी, राजू आवटे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, पिंटू ठाकूर, किरण महाजन, अजय नागराणी , सर्व नगरसेवक नगरसेविका, जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी सभापती सुनील महाजन, ज्ञानदेव झोपे, प्रीती पाटील, संगीता बियाणी, दीपाली बर्‍हााटे, रोहिणी पाटील, चेतना भिरूड, गणेश धनगर, वंदना उन्हाळे, महेंद्र ठाकुर, व्यापारी व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !