भुसावळ शहरातील प्रौढाचा छतावरून पडल्याने मृत्यू
Adult dies after falling from roof in Bhusawal city भुसावळ : छतावरून उतरताना पाय घसरल्याने प्रौढाचा डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शहरातील समर्थ नगरात मंगळवारी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
डॉक्टरांनी मृत केले घोषित
संजय रूपचंद झांबरे (48, समर्थ नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. संजय झांबरे हे मंगळवारी छतावरून खाली उतरत असताना पायरीवरून त्यांचा पाय निसटला व खाली पडल्याने त्यांना तत्काळ ट्रामा सेंटरला दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक यासीन पिंजारी करीत आहेत.
