मुक्ताईनगरातील प्रौढाचा पाय घसरून तलावात पडल्याने मृत्यू
An adult in Muktainagar died after his foot slipped and fell into the lake मुक्ताईनगर : मित्रासमवेत फिरायला गेलेल्या एकाच्या तलावात पडून मृत्यू झाला. लक्ष्मण रामभाऊ सावंत (43, निवृत्ती नगर, वॉर्ड क्रमांक 12, मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. सावंत हे मित्रांसोबत बोदवड रोडलगत असलेल्या वनविभागाच्या तलाव भागात फिरायला गेले असता लक्ष्मण सावंत यांचा पाय घसरला व त्यांचा बुडून मृत्यू झाला.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
बुधवार, 7 रोजी अनिल माणिक सावंत यांनी लक्ष्मण सावंत यांचे वडील रामभाऊ शंकर सावंत यांना फोनवरून याबाबत दुर्घटनेची माहिती कळवली. या प्रकरणी मयताचे वडील रामभाऊ शंकर सावंत यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
