कोळन्हावी गावातील चार जणांविरूध्द वीज चोरीचा गुन्हा


Crime of electricity theft against four people of Kolnhavi Village यावल : तालुक्यातील कोळन्हावी या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये गावात चार जण वीज चोरी करतांना आढळले. या चार जणांना त्यांनी चोरी केलेल्या युनिट नुसार दंडाची आकारणी करून नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड न भरल्याने चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोळन्हावी गावात कारवाईने खळबळ
कोळन्हावी, ता.यावल गावात राज्य विद्युत वितरण कंपनी यावलचे ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंता तुषार पाटील, तंत्रज्ञ हर्षल सोळंके, सरफराज तडवी, राजू सोळुंके, गोपाळ सोळुंके या पथकाने कोळन्हावी गावामध्ये वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली यामध्ये रवींद्र बुधो सोळुंके, संजय दयाराम सोळुंके, उत्तम पुंडलिक सोळंके व जंगलू रामा सोळंके हे चार जण वीज चोरी करतांना आढळून आले. या चार जणांना त्यांनी चोरी केलेला वीज युनिट नुसार दंड आकारणी करून नोटीस बजावण्यात आली मात्र त्यांनी वेळेत दंड भरला नाही. दंड भरला नाही म्हणून या चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !