भुसावळात गांजा ओढणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाईचा धूर


Action taken by police against ganja smokers in Bhusawal भुसावळ : नशेच्या आहारी जाणार्‍यांकडून शहरात अनेक गुन्हे घडल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गांजा ओढवणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. शहर पोलिसांनी महात्मा फुले नगरात गांजा ओढणार्‍या समाधान नामदेव सपकाळे (46, महात्मा फुले नगर, भुसावळ) यास बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास महात्मा फुले नगरातील नाल्याजवळून अटक केली.

कारवाई सुरूच राहणार
संशयिताविरोधात शहर पोलिसात नाईक जाकीर मन्सुरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक संदेश निकम करीत आहेत. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणासह अन्य ठिकाणी गांजा ओढणार्‍याविरोधात धडक मोहिम सुरू करण्यात आली असून ही मोहिम कायम सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !