बनोटीत विशेष पथकाचा जुगारावर छापा : दहा जुगार्‍यांसह 11 दुचाकी जप्त


Gambling raid by special squad in Banoti : 11 bikes seized with 10 gamblers सोयगाव : छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकाने बनोटी, ता.सोयगाव येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी करीत दहा जुगार्‍यांकडील एक लाख एक हजार 950 रुपयांच्या रोकडसह 11 दुचाकी तसेच नऊ मोबाईल मिळून आठ लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने जुगार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

कारवाईने उडाली खळबळ
सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर विशेष पथकांच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे सोयगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांना अनेकवेळा नागरीक सांगूनही धंदे बंद केले जात नसल्याने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. विशेष पोलीस पथकाचे पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बिघोत, श्रीकांत दांडगे, गोपाल पाटील, आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस दिसताच काही जुगारी पसार झाले. तपास पोलीस निरीक्षक अनमोल केदार करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !