ऑर्डनन्स फॅक्टरींना खाजगीकरणापासून वाचवा


खासदार रक्षा खडसेंना आयुध निर्माणी संयुक्त संघर्ष समितीचे साकडे

भुसावळ : कोणताही फायदा, नुकसान न बघता देशासाठी उत्पादन करण्याची परंपरा आयुध निर्माणीने जोपासली असून राज्यातील 10 आयुध निर्माणींचे खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी भुसावळ आयुध निर्माणीच्या संयुक्त संघर्ष समितीतर्फे मंगळवारी खासदार रक्षा खडसे यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. देशभरातील आयुध निर्माणींचा पहिल्या व दुसर्‍या महायुद्धापासून 218 वर्षांचा इतिहास असून सर्जिकल स्ट्राईक, चंद्रयान-2 मोहीमेतही आयुध निर्माणींचे योगदान असल्याने खाजगीकरण करु नये, अशी भूमिका स्थानिक संयुक्त संघर्ष समितीचे संयोजक दिनेश राजगीरे, प्रकाश कदम, किशोर चौधरी, राजकीरण निकम, एम.डी.वानखेडे यांनी प्रसंगी मांडली. खासदार खडसे यांनीही या मागणीसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले

राष्ट्रीय सुरक्षेत आयुध निर्माणीचे योगदान
कारगील युद्धात जेव्हा दारुगोळा व शस्त्रसाठा मुबलक नव्हता अशा परिस्थितीत आयुध निर्माणी कर्मचार्‍यांनी 12 तास दोन पाळीत काम करत मोठे योगदान दिले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आयुध निर्माणी कारखान्यांनी संरक्षण साहित्य उत्पादीत करुन परंपरा कायम ठेवल्याचे यावेळी खासदारांना सांगण्यात आले. प्रसंगी संघर्ष समितीचे नवल भिडे, गजानन चिंचोलकर, एम.एस.राऊत, हरीष इंगळे, प्रवीण मोरे, हिरालाल पारीस्कर, किशोर बढे, जितू आंबोडकर, पंकज सोनार आदी उपस्थित होते.


कॉपी करू नका.