भुसावळात दोन कारमध्ये जोरदार धडक : चालक जखमी, चार लाखांचे नुकसान
Heavy collision between two cars in Bhusawal : Driver injured, loss of four lakhs भुसावळ : भरधाव कारमध्ये अपघात झाल्याची घटना शहरातील तापी नगर जवळील राहुल नगराजवळ बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कार चालकाविरोधात गुन्हा
शहरातील राहुल नगराकडून सचिन इब्राहीम तडवी हे फैजपूरकडे त्यांच्या स्विफ्ट कारने (एम.एच.19 बी.यु.7757) ने जात असतांना समोरून येणार्या होंडा कंपनीच्या कार (एम.एच.19 डी.ई.8877) ने तडवी यांच्या चारचाकीला धडक दिली. या अपघातात गाडीचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. यात तडवी यांच्या डोक्याला व उजव्या डोळ्याजवळ मुका मार लागला. या अपघातात रीक्षालाही धडक बसल्याने रीक्षाचेही नुकसान झाले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहे.
