भुसावळात चाकूच्या धाकावर जळगावातील सेवानिवृत्ताचे 50 हजार लूटले


50,000 looted from a pensioner in Jalgaon at knifepoint in Bhusawal भुसावळ : शहरात गुन्हेगारांच उपद्रव थांबायला तयार नाही. चाकूच्या धाकावर बसस्थानकात आलेल्या सेवानिवृत्ताला भरदिवसा धमकावून लुटण्याची आल्याची घटना बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास बसस्थानकात शौचालयाजवळ घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त कर्मचारी एकनाथ बाबुराव निळे (79, ओझरखेडा, ता.भुसावळ, ह.मु.म्युन्सीपल कॉलनीजवळ. जळगाव) यांच्या तक्रारीवरून संशयित आशू व गेंदू या संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकू लावत लुटली रक्कम
ओझरखेडा येथील रहिवासी व हल्ली जळगावच्या गायत्री नगरात स्थित एकनाथ बाबूराव निळे हे बुधवार, 7 जून भुसावळ बसस्थानकावर आले असता लघूशंकेसाठी शौचालयात गेल्यानंतर संशयित आशु आणि गेंदू यांनी चाकू लावून त्यांना धमकावले व त्यांच्याकडील 50 हजार रुपये रोख जबरीने हिसकावून घेतले. भर दुपारी एक वाजता घडलेल्या या घटनेनंतर निळे घाबरले व त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

एका संशयिताला अटक
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे व पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली. एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा साथीदार मात्र पसार झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !