भुसावळात किरकोळ वादातून अल्पवयीन तरुणास मारहाण
A minor was beaten up due to a minor dispute in Bhusawal भुसावळ : शेजारी राहणार्या दोन कुटूंबातील मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर लाकडी रवईने मारहाण करण्यात आल्याची घटना नसरवांजी फाईल भागातील सुरभी कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी एका संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल
शबाना बी.सैय्यद नजीम (42, नसरवांजी फाईल, सुरभी कॉम्प्लेक्स समोर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या 17 वर्षीय अफान या मुलास संशयित रहिम गुलाब पिंजारी (भुसावळ) यांनी लाकडी रवईने डोक्यावर मारून दुखापत केली तसेच शिविगाळ केली. तपास नाईक यासीन सत्तार पिंजारी करीत आहेत.
