फैजपूर शहरात अवैध गोवंश वाहतूक : पाच गुरांची सुटका


Illegal Cattle Traffic In Faizpur City : Five Cattle Rescued यावल : फैजपूर शहरातील श्रीराम टॉकीजच्या मागे कुरेशी मोहल्यात दोन वाहनातून दोघे अवैधरीत्या गोवंश वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई करीत दोन वाहने जप्त केली तर 38 हजार रुपये किंमतीच्या पाच गुरांची सुटका करण्यात आली. दोन वाहनांसह गोवंश असा दोन लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागरीकांच्या तक्रारीअंती कारवाई
फैजपूर शहरात श्रीराम टॉकीजच्या मागे कुरेशी मोहल्ला आहे. या कुरेशी मोहल्ल्यामध्ये वाहन (क्रमांक एम.एच.21 एक्स.1615) व (एम.एच.04 डी.एस. 2873) यात पाच गोवंशांना अवैधरीत्या कोंबून वाहतूक केली जात असताना ैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व घटनास्थळी पोलिसांनी जावून दोन्ही वाहन ताब्यात घेतले. वाहन चालक आवेश असलम कुरेशी (सावदा, ता.रावेर) व सय्यद उमर सय्यद इकबाल (रसलपुर, ता.रावेर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वाहनातील पाच गोंवश असा एकूण दोन लाख 18 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भूषण ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !