रावेरातील अवैध धान्यसाठा प्रकरण : दोन्ही गोदाम मालकाविरोधात गुन्हा
Illegal grain storage case in Raver : Crime against both godown owners रावेर : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रावेरात रेशन मालाचा अवैध धान्यसाठा करणार्या दोन गोदामांना सील लावले होते. दहाव्या दिवशी आठ लाखांचा रेशन मालाचा धान्य साठा साठवल्याप्रकरणी चौधरी ट्रेर्ड्सच्या मालकासहीत एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अवैधरीत्या धान्य मालाची साठवणूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
गुन्हा दाखल झाल्याने उडाली खळबळ
31 मे रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शहरातील बर्हाणपूर रोडवरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैध साठा असल्याच्या तक्रारीअंती दोन गोदामांना सील लावले होते. गेल्या दहा दिवसात या प्रकरणी अहवाल व चौकशी करण्यात आल्यानंतर आज शनिवार, 10 जून रोजी पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांनी रावेर पोलिस स्थानकात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी गणेश देवराम चौधरी रावेर यांच्या चौधरी ट्रेडर्स नावाच्या गोदामात एकूण सात लाख 77 हजार 200 रुपयांचा धान्यसाठा आढळल्याप्रकरणी तसेच संशयित आरोपी मो.रेहान शेख नईम (रा.नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामात 27 हजार 450 रुपये किंमतीचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहे.
