नायगावातील तरुणाचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू


A young man in Naigaon died due to electric shock मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव येथील तरुणाचा इलेक्ट्रीक मोटार सुरू करताना शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ सोनू मराठे (नायगाव, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे.

इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागताच मृत्यू
विजय हा तापी नदीवरील मोटर चालू करून येतो असे भावाला सांगून गेला परंतु तो दुपारपर्यंत घरी परतला नाही. मोठ्या भावाने नदीपात्राजवळ जाऊन बघितले असता सोनू मराठे हा तरुण शॉक लागून मयत झाल्याचे दिसून आले. मयताच्या भावाने आरडाओरड केल्यानंतर गावातील ग्रामस्थ व पोलीस पाटील, सरपंच अशांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व घटनेबाबत पोलिसांना कळवले. गुरुवारी ही घटना घडली. दरम्यान, बसवण्यात आलेली मोटर ही रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या मालकीची असून मोटारीमध्ये करंट असल्याचे त्यांना माहिती दिली होती परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे आज तरुणाला जीव गमवावा लागल्याने रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !