अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी उद्या मनसेचा रास्तारोको
MNS roadblock tomorrow for the repair of Ankleshwar-Berhanpur state road यावल : गेल्या काही महिन्यांपासून अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. यावलपासून चोपड्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर खड्डे चुकवतांना अनेकवेळा अपघात झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी मनसेकडून सोमवारी रस्तारोको आंदोलन केले जाणार आहे. शहरातील चोपडा रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ सकाळी 10 वाजेला रास्तारोको आंदोलन होईल.
आंदोलनानंतर प्रशासनाला जाग येण्याची अपेक्षा
यावल शहरातून मार्गस्थ होणारा अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्ग हा यावलपासून ते चोपड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे. या रस्त्याचे हस्तांतरण केंद्रीय मार्गाकडे झाले आहे. असे असले तरी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी रस्तारोको आंदोलन केले जाणार आहे. चोपडा रस्त्यावर विरावली फाट्या जवळील वनविभाग कार्यालया समोर सदर आंदोलनाला सकाळी 10 वाजेपासुन सुरवात होणार आहे. या आंदोलनात मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, सह उपजिल्हाध्यक्ष अजय तायडे, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, शहराध्यक्ष गौरव कोळी, कुणाल बारी, उपजिल्हाध्यक्ष जळगाव राजेंद्र निकम, निलेश खैरनार, विकास पाथरे, शुभम पाटील सह मोठया संख्येत पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी राहणार आहे.

