पुणे महामार्गावर भीषण अपघात : चार प्रवासी ठार


Fatal accident on Pune highway: Four passengers killed पुणे :: पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेल्या वाहनांमध्ये भीषण अपघात होवून चार प्रवासी ठार झाले. पुणे- सातारा महामार्गावर कापूरहोळजवळ वरवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात 23 जण गंभीर जखमी असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी सकाळी साधारण 10 वाजेच्या आसपास हा अपघात झाला. वाहनांची धडक एवढी भीषण होती की, यामध्ये खासगी बस पूर्ण उलटली. अपघातात एसटीच्या शिवशाही बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

बस उलटताच प्रवाशांचा मृत्यू
अपघातग्रस्त वाहने पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जात असताना कंटेनरला खाजगी बसने मागून जोराची धडक दिल्याने बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी आहेत. याचवेळी मागे असलेल्या शिवशाही बसचीही कंटेनरला धडक बसली. एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आले. हा अपघात एसटीच्या भोर आगाराच्या हद्दीमध्ये घडला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !